जेष्ठ नागरिक संघातर्फे योग दिन उत्साहात साजरा

ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशी तर्फे योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .कार्यक्रमाची सुरूवात योग महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेला ज्येष्ठ सदस्य खेडेकर सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सुरुवातीला प्रार्थना व ओमकार जपा अंतर योगशिक्षक अशोक कांबळी यांनी योग दिवस पतंजलींचा अष्टांग योग आणि जीवन आरोग्यपूर्ण होण्यासाठी प्राणायाम व आसणे यांचे महत्त्व सांगितले. त्यानंतर साधकांकडून विविध आसनांची प्रात्यक्षिके आणि प्रत्येक आसणांचा शरीरावर होणारा चांगला परिणाम सांगितला. संगीताच्या तालावर काही योगासने करून घेतली. टाळी व मृदंग योग प्रार्थना आणि ध्यानाने योग वर्गाचा समारोप करण्यात आला. या शिबिराला जेष्ठांसह छोट्या बालकांनी उपस्थिती दर्शवली होती.

error: Content is protected !!