पुढारी’चे दीपक जाधव यांना सीताराम सावळ स्मृती पुरस्कार

दीपक जाधव हे आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र

गोवा मराठी पत्रकार संघाच्या स्थापना दिनानिमित्त कला अकादमीच्या ब्लॅक बॉक्स येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात ‘पुढारी’चे उपसंपादक दीपक जाधव यांना ज्येष्ठ पत्रकार कै. सीताराम सावळ यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा सीताराम सावळ स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दीपक जाधव हे मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरगाव गावचे रहिवासी असून त्यांनी सिंधुदुर्गातही पत्रकार म्हणून काम केले आहे.
संपादकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ स्थापन केलेल्या या पुरस्कारासाठी दीपक जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
याच समारंभात पत्रकारितेतील विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या इतर पत्रकारांचाही सन्मान करण्यात येणार आहे. ग्रामीण पत्रकारितेसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी विशांत वझे आणि सुभाष महाले यांची निवड झाली आहे. तसेच ज्येष्ठ पत्रकार कै. नरसिंह प्रभू यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी सुरज प्रभू यांची निवड करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, कला अकादमीचे अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर तसेच आमदार केदार नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

सिं

error: Content is protected !!