आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे पाठीशी

जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची ग्वाही

ग्रामस्थांवरील गुन्हे मागे न घेतल्यास आंदोलन

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी (शप) पक्ष आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या सोबत आहे. येथील ग्रामस्थांवरील दाखल गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शप)पक्षाची असून जर लवकर गुन्हे मागे घेतले नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस (शप)पक्षामार्फत.आदोलनाचा निर्णय घेतला जाईल असा इशारा पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली. आजगाव दशक्रोशीतील गावातील ग्रामस्थां सोबत सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्ष खंबीरपणे पाठीशी राहील, अशी ग्वाही देखील श्री. सामंत यांनी दिली आहे.
वेंगुर्ला तालुक्यातील आजगाव,धाकोरे,आरवली,सोन्सुरे मळेवाड,सखेखोल,आसोली या सात गावच्या ग्रामस्थांनी ग्रामसभांच्या माध्यमातून या परिसरात मायनीगला सुरुवाती पासूनच गेली दोन वर्षे विरोध करत असतानाही प्रशासनाने जेएसडब्ल्यु या कंपनीला परवानगी देताना ग्रामसभेच्या अधिकारावर गदा आणण्यासाठी संबंधित प्रशासनाने कोणाच्या राजकीय दबावाने हा निर्णय घेतला, आणि यामध्ये जे जे अधिकारी सहभागदार असतील त्यांना तात्काळ निलंबित करुन याप्रकरणी सखोल चौकशी करुन फौजदारी गुन्हे दाखल करावेत, कारण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांना संविधानाने एवढे अधिकार दिलेले आहेत त्याचे उल्लंघन संबंधित प्रशासनाच्या माध्यमातून होत असेल तर ग्रामसभांचे स्तोम शासन स्तरावरून का माजवले जाते ? जर ग्रामस्थांच्या निर्णय प्रक्रियेला किंमत नसेल शासनाने ग्रामसभांचे स्तोम बंद करावेत. तसेच जेएसडब्ल्यु कंपनीच्या माध्यमातून जे ड्रोन सर्वेक्षण करताना ज्याप्रकारे दहशतीचे वातावरण निर्माण करताना जेएसडब्ल्युच्या अधिकाऱ्यांनी सत्ताधारी पक्षाच्या बड्या पदाधिकाऱ्यांची नावे घेतली त्या सत्ताधारी पक्षाने मायनिग बाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून अशा वादग्रस्त प्रकल्पांना खतपाणी घालून जिल्ह्या बाहेरील धनदांडगे आपल्या जिल्ह्यात आणून स्थानिक ग्रामस्थामध्ये संघर्ष व अशांतता निर्माण करून आपले इप्सित साध्य करू पाहणाऱ्यांना यापुढे स्थानिक ग्रामस्थ धडा शिकविल्या शिवाय राहणार नाहीत.
हे उद्योग फक्त कालच्या प्रकरणापुरतेच मर्यादित नसून सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे अनेक विनाशकारी प्रकल्प आणून सत्ताधारी आपली इप्सिते साध्य करण्यासाठी यापूर्वीही असे प्रयत्न झाले आहेत आणि भविष्यातही होतील. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम जनतेने यांना योग्य वेळी धडा शिकविण्याची गरज आहे. तरच आपल्या जिल्ह्यात प्रदूषित आणि धोकादायक प्रकल्प यापुढे आणण्याचे धाडस कोणी करणार नाही. अशा प्रकल्पांना विरोध करताना न्याय व शांततेच्या पद्धतीने करावा. कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे निर्णय न घेता विरोध करावा. आताचे सत्ताधारी जिल्ह्याबाहेरील अशा लोकांना खतपाणी घालून स्थानिकावर गुन्हे कसे दाखल होतील याचीच वाट बघत असतात. सत्ताधाऱ्यांना फक्त पाच वर्षांतून एकदाच मतांसाठी आपली गरज आहे. यांचा विचार करावा, आणि शांततेच्या मार्गाने संघर्ष करावा. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी (शप) पक्ष आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या सोबत आहे.
ग्रामस्थांवरील दाखल गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. मायनिग सर्वेक्षणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर जेएसडब्ल्यु कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत ही प्रमुख मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शप)पक्षाची असून जर लवकर गुन्हे मागे घेतले नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस (शप)पक्षामार्फत.आदोलनाचा निर्णय घेतला जाईल,असा गर्भित इशारा देऊन आजगाव दशक्रोशीतील गावातील ग्रामस्थां सोबत सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्ष खंबीरपणे पाठीशी राहील, अशी ग्वाही जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांनी दिली,

error: Content is protected !!