कणकवलीच्या विकासाची प्रक्रिया सुरू, यापुढे भरीव विकास कामे होणार!

कणकवली शहरातील श्री स्वयंभू नमो उद्यानाच्या कामाचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते भूमिपूजन

कणकवली शहरात सुतारवाडी – निमेवाडी या ठिकाणी एक कोटी रुपयांच्या श्री स्वयंभू नमो उद्यानाच्या कामाचे भूमिपूजन कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात आले. कणकवली शहरामध्ये अनेक विकास कामे होऊ घातली असताना अशा उद्यानांच्या माध्यमातून त्या भागातील नागरिकांना सोयी सुविधा निर्माण करून देणे व उद्यानाच्या माध्यमातून विरंगुळ्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना जागा उपलब्ध करून देणे हा या मागचा उद्देश आहे. लहान मुले तसेच नागरिक यांच्या सोयीच्या दृष्टीने कणकवली शहरात अशा प्रकारची अद्ययावत अशी उद्याने केली जाणार असून कणकवली नगरपंचायत येत्या काही दिवसांमध्ये विकासाच्या दृष्टीने भरीव कामगिरी करताना पाहायला मिळेल. असा विश्वास नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी व्यक्त केला. या भूमिपूजन प्रसंगी पारकर बोलत होते. त्यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, मुख्याधिकारी गौरी पाटील, माजी आमदार राजन तेली, नगरसेवक संकेत नाईक, लूकेश कांबळे, दिवाकर मुरकर, महेश कोदे, प्रशासन अधिकारी अमोल अगम आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!