कणकवली शहरातील जुन्या भाजी मार्केटच्या जागेवर नवीन व्यापारी संकुल होणार!

पालकमंत्री नितेश राणे यांनी ग्वाही दिल्याची सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांची माहिती
कणकवली शहरातील पटवर्धन चौक येथील नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ ( भाजी मार्केट) नगरपंचायत मालकीच्या जागेवर नवीन व्यापारी संकुलन उभारणी बाबतची मागणी आज पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेत तेथील व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पडणेकर यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत पत्रकार अशोक करंबेळकर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी नवीन व्यापारी संकुलन उभारणी करण्याचा शब्द दिला. राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी पालकमंत्री यांना पुष्पगुच्छ देउन शुभेच्छा दिल्या व आभार देखील व्यक्त केले.





