ट्रॅम्पोलिन आशियाई स्पर्धेत सहाव्या स्थानी आलेल्या मंथन उकर्डे याचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

मंथन अजून मोठा हो, लागणारी सर्वतोपरी मदत करू!

पालकमंत्री नितेश राणेंची मंथन उकर्डे व कुटुंबीयांना ग्वाही

कणकवली तालुक्यातील 12 वर्षाच्या मंथन पराग उकर्डे या सुपुत्राने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्वल केले असून, आशियाई ट्रॅम्पोलिन स्पर्धेसाठी या विद्यार्थ्यांची निवड झाली होती. नुकत्याच झालेल्या चायना हॉंगकॉंग येथील पार पडलेल्या आशियाई ट्रॅम्पोलिंग स्पर्धेत प्रत्येक गटाकरिता संपूर्ण देशभरातून दोन खेळाडूंची निवड करण्यात आली होती. त्याच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची मंथन व त्यांच्या कुटुंबीयांनी भेट घेतली. पुढे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये देखील सहभागी होत यशस्वी हो असा आशीर्वाद देत लागणारी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या कुटुंबीयांना दिली. भारतातून या स्पर्धेकरिता 12 वर्षीय वयोगटामध्ये कणकवली तालुक्याचा सुपुत्र मंथन उकर्डे याची निवड करण्यात आली. मंथन यांने हॉंगकॉंग येथे झालेल्या या आशियाई स्पर्धेमध्ये सहावे स्थान प्राप्त करत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरापेचात मानाचा तुरा रोवला आहे. भारताच्या व त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने देखील ही गौरवास्पद बाब आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे विशेष कौतुक केले जात असून, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मंथन उकर्डे याला या हॉंगकॉंग येथील स्पर्धेत सहभागी होण्याकरिता आर्थिक मदत करत त्याला प्रोत्साहन दिले होते. स्पर्धेत यश मिळवल्यानंतर भारतात परतल्यावर मंथन व त्यांच्या कुटुंबीयांनी आज कणकवलीत ओम गणेश या निवासस्थानी पालकमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मंथन याच्यासोबत त्याची आई व आजी उपस्थित होते.

error: Content is protected !!