मान्सूनपूर्व पावसात कणकवली नगरपंचायत चा दावा ठरला फोल

माजी नगरसेविकेच्या दारातच चिखलाचे साम्राज्य

प्रशासन व लोकप्रतिनिधी लक्ष देणार का?

कणकवली शहरभर बुधवारी सायंकाळी पडलेल्या अर्ध्या तासाच्या पावसात माजी नगरसेविका राजश्री धुमाळे यांच्या घरासमोरील रस्त्यावर चिखलच चिखल झाला. मान्सूनपूर्व गटारसफाई पूर्ण झाल्याच्या दाव्याची पोलखोल रस्त्यावर झालेल्या चिखलाने केली आहे. नगरपंचायत इमारतीलगत पटकीदेवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर माजी नगरसेविका राजश्री धुमाळे यांचे घर आहे. धुमाळे यांच्या घरासमोर रस्त्यालगत गटाराची सफाई करण्यात आली. मात्र गटारसफाई केल्यानंतर सगळाचा कचरा, साचलेली गाळयुक्त माती गटारालगत रस्त्यावरच ठेवण्यात आली होती. त्यामुळे बुधवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पडलेल्या पावसात हा रस्ता पूर्णतः चिखलमय झाला होता. या भागातून रस्त्यावरून चालणेही नागरिकांना मुश्किल झाले आहे. नगरपंचायत सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ गटारसफाई नंतर रस्त्यावर ठेवलेली माती हटवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. तसेच या साऱ्या प्रकारानंतर शहरातील अशा सर्वच स्थितीचा नगरपालिका प्रशासनाने आढावा देखील घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!