गायत्री स्पोर्ट, रवळनाथ मित्रमंडळ आयोजित कुणाल चषकाचा मानकरी

उपविजेता ए.के.स्पोर्ट वरवडे
विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण
रवळनाथ मित्रमंडळ आयोजित कुणाल चषक प्रीमियर लीग २०२३ क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामान्यात गायत्री स्पोर्ट कलमठ संघाने ए. के. स्पोर्ट वरवडे संघाचा पराभव करत कुणाल चषकावर आपले नाव कोरले. ए. के. स्पोर्ट संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेचा अंतिम सामना ए के स्पोर्ट वरवडे विरुद्ध गायत्री स्पोर्ट कलमठ यांच्यात खेळवण्यात आला. यात गायत्री स्पोर्ट कलमठ संघाने नाणफेक जिंकत फलंदाजीचे आमंत्रण दिले. ५ षटकांमध्ये ए के स्पोर्ट संघाने ६ गाड्यांच्या मोबदल्यात ५८ धावा केल्या. यात दैवत पारकर याच्या वैयक्तिक २९ धावा होत्या. गायत्री स्पोर्ट कलमठ संघाने ए. के. स्पोर्टने दिलेले धावांचे आव्हान तीन गडी गमावत ४.२ षटकांत पूर्ण
केले. गायत्री स्पोर्टचा आयकॉन प्रकाश पराडकर याने धडाकेबाज फलदांजी केली.
या स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसे उत्कृष्ट फलंदाज–जाविद खान, गोलंदाज – विनोद चव्हाण,
यष्टीरक्षक- दाजी नाईक, क्षेत्ररक्षक – शुभम चिंदरकर, मालिकावीर – प्रकाश पराडकर,अंतिम सामन्यातील समानावीर-प्रकाश पराडकर यांनी मिळवली.
स्पर्धा पार पडल्यानंतर विजेत्या व उपविजेत्या संघांना विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक सुशांत नाईक, नगरसेवक रुपेश नार्वेकर, शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, युवा सेना शहर प्रमुख आदित्य सापळे, शिवसेना पक्षाचे उपाध्यक्ष शेखर राणे, सचिन आचरेकर, चंद्रकांत बागवे, दिलीप साटम, सुनील दळवी, श्रीकांत दळवी, उमेश बागवे, तेजस राणे, सुवर्णकार महेश कुडाळकर, देवू बागवे, परेश बागवे, महेश राणे आदी उपस्थित होते.
अंतिम सामन्यात पंच म्हणून अमित कासले, मेघन सरंगले यांनी काम पाहिले. गुणलेखक म्हणून विवेक परब यांनी काम पाहिले. समालोचन प्रसाद चाळके, सागर कदम, विवेक परब यांनी केले. समालोचकांनी मालवणी भाषेत केलेले समालोचनामुळे स्पर्धेत रंगत आली. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी
गुरुदास करंबेकर, अमित बागवे, अनंत राणे, रजत राणे, चेतन पेडणेकर, साईराज बागवे, श्रीकांत दळवी, मनोज पाटील, मिथुन चव्हाण, चेतन पवार आदींनी मेहनत घेतली. ही स्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
कणकवली प्रतिनिधी