संजय घोडावत विद्यापीठाच्या 900 हुन अधिक विद्यार्थ्यांची इंटर्नशिप पूर्ण

संजय घोडावत विद्यापीठाने ‘औद्योगिक क्षेत्राच्या बदलत्या आवश्यकतेनुसार इंडस्ट्री रेडी ग्रॅज्युएट्स व बिझनेस रेडी प्रोफेशनल्स तयार करणे’ हे ध्येय समोर ठेवून अभ्यासक्रमाची आखणी औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन केली आहे. त्यानुसार विध्यापीठातील सर्व विभागातील विध्यार्थ्यांना इंडस्ट्री इंटर्नशिप पूर्ण करणे अनिवार्य आहे.

      2025-26 या शैक्षणिक वर्षात एम. टेक, एमबीए, एमसीए, एम. एस. सी. बी. टेक, बीबीए, बीसीए, बी. कॉम. बी फार्म, डी फार्म, इ. विभागातील अंतिम वर्षाच्या सुमारे 900 हुन अधिक विद्यार्थ्यांची देशभरातील विविध नामांकित उद्योगांमध्ये इंटर्नशिपसाठी निवड झाली होती. या सर्व विद्यार्थ्यांनी आपली इंटर्नशिप यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

     विद्यार्थ्यांना देशभरतील नामांकित डीआरडीओ, टाटा बोईंग, स्टार एअर, एअर इंडिया, टाटा मोटर्स, टाटा एनरजी सोल्युशन्स, भारत फोर्ज, टोयोटा किर्लोस्कर, न्यू एआय लॅब, जीवो  प्लॅटफॉर्म्स, टीसीएस, दोशाहीन सोल्युशन्स, पेंटागॉन स्पेस, अँमडॉक्स, केन ग्लोबल, सॅंकी सोल्युशन्स, सार्वम  एआय, मार्कटिक्स एआय, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स, अर्हम इलेक्ट्रॉनिक्स, एलकॉम  इंटरनॅशनल, सॅंफ्लर इंडिया, आधार हौसिंग फायनान्स, ओरिअन  रिसर्च, ब्लू क्रॉस  लॅबोरेटरीज, सॅनोफी  हेल्थकेयर, हाफकिन बाओफार्म, स्टुडिओ  येबीडी, टीवी-9 मराठी यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता आला. 

    निवडक विद्यार्थ्यांना इंटर्नशिपदरम्यान दरमहा रुपये 5000 ते 20,000 पर्यंत स्टायपेंड देण्यात आले. काही विद्यार्थ्यांची ‘इंटर्नशिप विथ प्लेसमेंट’ अंतर्गत निवड झाली असून, इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर त्यांना संबंधित कंपनीत नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. इंटर्नशिपमुळे विद्यार्थ्यांना शिकलेल्या संकल्पनांचा प्रत्यक्ष कामात वापर करण्याची संधी मिळते. औद्योगिक अनुभव, वेळेचे नियोजन, शिस्त, मल्टिटास्किंग यांसारख्या कौशल्यांचा विकास होऊन विद्यार्थी अधिक सक्षम बनतात.

  विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिपसाठी विद्यापीठात ‘इंडस्ट्री युनिव्हर्सिटी रिलेशन्स’ विभाग कार्यरत असून, संचालक डॉ. नितीन पुजारी, सर्व विभाग समन्वयक, विभाग प्रमुख व प्राध्यापक यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रा. डॉ. उद्धव भोस्ले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांनी अभिनंदन केले.
error: Content is protected !!