तरूणानीं उद्योजकतेची कास धरावी – अँड.नकुल पार्सेकर

कुडाळ मध्ये नव उद्योजकांचे निवासी शिबिर संपन्न

नव्वदच्या दशकानंतर आपल्या देशाने डंकेल प्रस्ताव स्विकारला. खुल्या अर्थव्यवस्थेमुळे अर्थातच सरकारी नोकरीला मर्यादा आल्या. त्यानंतरच्या काळात झपाट्याने झालेल्या यांत्रिकीकरणामुळे आणि आता झालेली डिजीटल क्रांती यामुळे मनुष्यबळाची गरज कमी झाली, अशावेळी आजच्या तरूण- तरूणीनी नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगार निर्माण केला पाहिजे. आपल्या व्यवसायातून निर्माण होणाऱ्या उत्पादनाची गुणवत्ता टिकवली पाहिजे असे आवाहन कुडाळ एम.आय डि.सी.इंडस्ट्रीज असोसिएशनचे कार्यवाह अँड.नकुल पार्सेकर यानी केले.
कुडाळ येथील ओंकार सभागृहात महाराष्ट्र शासन उद्योग संचनालय मुंबई पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता केंद्र आयोजित मुख्यमंञी रोजगार निर्मिती कार्यक्रमा अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या लाभार्थ्यांना कर्ज मंजूर झालेली आहेत त्यांच्या निवासी उद्योजकता शिबिरामध्ये ते बोलत होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बत्तीस नवउद्योजकांचे बारा दिवसांचे निवासी शिबीर संपन्न झाले. त्या शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमात अँड.पार्सेकर बोलत होते.
ऍड. पार्सेकर म्हणले, केंद्र सरकार वा राज्य सरकारच्या ज्या नवउद्योजकाना आत्मनिर्भर करण्यासाठीच्या विविध योजना आहेत त्याचा लाभ घेऊन स्थानिकांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
यावेळी प्रकल्प अधिकारी राजेश कादंळगावकर यानीही नवीन उद्योग करत असताना घ्यावयाची खबरदारी आणि काटेकोर व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.
एमसीइडी सिंधुदुर्गच्या कार्यक्रम समन्वयक सौ.सुषमा साखरे यानी आभार मानले.

error: Content is protected !!