राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

सिंधुदुर्ग राष्ट्रवादी संघटना बांधणीच्या दृष्टीने चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. यावेळी विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल शुभेच्छा देतानाच संघटना बांधणीच्या अनुषंगाने ही चर्चा करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना अधिक बळकट करण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हाध्यक्ष म्हणून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याप्रमाणे आपणही कायम तुमच्या सोबत असल्याचे श्रीमती पवार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अबिद नाईक यांच्या पत्नी हुमेरा नाईक, मुलगी रीजा नाईक, आक्सा शिरगावकर उपस्थित होते.

error: Content is protected !!