परी सलून च्या पूनम मिठबावकर महेश मिठबावकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल

युवती छेडछाड प्रकरणी जाब विचारण्यासाठी गेले असता शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण
कणकवली शहरातील तेली आळी परिसरात असलेल्या परि सलून मधील परप्रांतीय कामगारांनी कणकवलीतील एका अल्पवयीन दिव्यांग युवतीची छेड काढल्या प्रकरणी जाब विचारण्यासाठी गेले असता परी सलून च्या पुनम मिठबावकर व महेश मिठबावकर यांनी शिवीगाळ करत शर्टाच्या कॉलरला धरून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी या दोघांवरही अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कणकवली शहरातील तेली आळी येथील राहणारे गौरव भानुदास हर्णे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीनुसार हा अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत गौरव हर्णे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार कणकवली शहरात असलेल्या परि सलुनमध्ये परप्रांतीय कामगार कामाला आहेत. या परप्रांतीय कामगारांनी शहरातील दोन तरुणींचा पाठलाग केला. व त्यातील एकीचा हात धरला याबाबतची तक्रार कणकवली पोलिसात दाखल असून त्यानुसार 15 मे रोजी संबंधित आरोपींवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर 15 मे रोजी पूनम मिठबावकर व महेश मिठबावकर यांनी गौरव हर्णे यांना तेथे बोलावून घेतले. त्यावेळी गौरव हर्णे हे आपले मित्र मिथुन ठाणेकर व सुनील यांच्यासोबत परी सलून येथे गेले. त्यावेळी तिथे असलेल्या महेश मिठबावकर यांना तुम्ही परराज्यातील तरुण येथे कामासाठी आणता. त्यामुळे तुमचे परराज्यातील कामगार येथील स्थानिक मुलींची छेड काढतात. ही बाब चुकीची असल्याचे त्यांना सांगितले. याबाबत चर्चा सुरू असतानाच पुनम मिठबावकर यांनी गौरव हर्णे यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून गेल्या. पूनम मिठबावकर व महेश मिठबावकर यांनी मिथुन ठाणेकर व सुनील यांच्या शर्टाच्या कॉलरला पकडून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार गौरव हर्णे यांनी पोलिसात दिली आहे. त्यानुसार कणकवली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता चे कलम 352, 351 (3), 3 (5) यानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.





