बॅ.नाथ पै सेंट्रल स्कूल 12वी चा 100 टक्के निकाल

सीबीएसई बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यश

कुडाळ येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या वर्षीही सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत आपल्या 100 टक्के यशाची परंपरा कायम राखली आहे.
सन 2025-26 मध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE Board)वतीने घेण्यात आलेल्या कुडाळ येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल चा इ. 12 वी चा निकाल नुकताच घोषित करण्यात आला. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
या परीक्षेत बॅ नाथ पै सेंट्रल स्कूलचे एकूण 12 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी गुणानुक्रमे प्रथम क्रमांक प्राप्त गुणवंत विद्यार्थी खालीलप्रमाणे शास्त्र शाखा – शौनक सुनील नर 83.2%, ओमसाई रमेश शेरीगर 72.4%, खेमराज मेघ:शाम रेडकर 71.6%. वाणिज्य शाखा – श्रावणी संदीप सामंत 92.4%.
प्रशालेच्या 12 विद्यार्थ्यांपैकी 2 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये, 6 विद्यार्थी द्वितीय श्रेणी मध्ये, तर 4 विद्यार्थी तृतीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. अमृता गाळवणकर, प्रशालेच्या प्राचार्या सौ. चैताली बांदेकर, सर्व शिक्षक वृंद, शिक्षक पालक संघाचे प्रतिनिधी या सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!