नेरुर येथे रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

जागतिक परिचारिका दिनानिमित्त नाईक रुग्णालयात आयोजन

जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्ताने कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय नेरुर येथे आयोजित रक्तदान शिबिरास रक्त दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
१२ मे हा दिवस आद्य परिचारिका क्षेत्राच्या जनक फ्लॉरेन्स नाईन्टीगल यांचा जन्म दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून संपूर्ण जगात परिचर्या क्षेत्रात अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग कॉलेज कुडाळ , कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र नेरुर, कुडाळ, तसेच एस. एस. पी. एम. मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन नेरुर येथील कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र येथे करण्यात आले होते.
फ्लॉरेन्स नाईंटीनगल यांनी जसे अत्यंत कठोर परिश्रमातून या परिचर्या क्षेत्राला जी नवीन ओळख निर्माण करून दिली आहे, त्याचप्रमाणे आता होऊ घातलेल्या परिचर्या क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत कष्टाने आणि मेहनतीने आपल्या या क्षेत्राला आणि स्वतःला उच्च पदावर नेऊन ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. स्वतःची या जगामध्ये चांगलीओळख निर्माण करा आणि रुग्णांना चांगली सेवा देऊन या परिचारिका क्षेत्राची मान अधिक उंच करा, असे प्रतिपादन सौ शलाका परब यांनी केले. या आयोजित कार्यक्रमास अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या.
नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल विलेपार्ले मुंबई येथे मुख्य परिचारिका अधिकारी या पदावर कार्यरत होत्या. त्यांनी जवळपास ३० वर्षे परिचर्या क्षेत्रात सेवेसाठी व्यतीत केली आहेत.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याकडून घेण्यात आलेल्या लेखी परीक्षांमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थांचा गुणगौरव देखील या निमित्ताने करण्यात आला.
बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज च्या प्राचार्या सौ कल्पना भंडारी तसेच उप प्राचार्या सौ वैशाली ओटवणेकर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरासस रक्तदात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी केले तर उपस्थितांचे आभार यांनी मानले.

error: Content is protected !!