जालन्यात भाजपा परिवाराचे ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान’ उत्साहात संपन्न

भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना रुजविण्यासाठी प्रशिक्षण महाभियान
भाजपा परिवाराच्या वतीने देशभरात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जालना शहर व जालना ग्रामीण जिल्हा प्रशिक्षण वर्ग कार्यक्रम छ.संभाजीनगर येथे पार पडला.या प्रशिक्षण वर्गाला उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
भाजपा परिवारातील कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना रुजावी यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. याच राष्ट्रीयत्वाच्या भावनेतून लोकहिताला केंद्रस्थानी ठेवून भाजपा परिवाराची विकासाभिमुख कार्यशैली आणि विचारधारा सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन यावेळी केले.
याप्रसंगी खा. रामराव वडकुते, खा. डॉ. भागवत कराड, आ. बबनराव लोणीकर, आ. संतोष पाटील, आ. तथा जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण कुचे, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जालना महापालिकेच्या महापौर वंदनाताई मगर, माजी आमदार कैलास गोरंट्याल, जालना महापालिकेचे उपमहापौर राजेश राऊत, जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे, छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





