‘गव्हर्नमेंट गाईड’ पुस्तकाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रकाशन

सकाळच्या वर्धापनदिना निमित्त उपयुक्त ‘गव्हर्नमेंट गाईड’चे अनावरण

सकाळ वृत्तपत्राच्या सावंतवाडी विभागीय कार्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या ‘गव्हर्नमेंट गाईड’ या उपयुक्त पुस्तकाचे आज सिंधुदुर्ग येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. विविध शासकीय योजना, सुविधा आणि शासनाच्या उपक्रमांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना सहजपणे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकेटे, एडिशन हेड शिवप्रसाद देसाई, वार्ताहर नंदकुमार आयरे, विनोद दळवी, जाहिरात विभागाचे हेमंत खानोलकर, शुभम नाईक तसेच वितरण विभागाचे गुरुनाथ कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!