आवळेगाव-हिलॉक-निवजे-आंबेरी मार्गावरील नव्या पुलाचे लोकार्पण संपन्न

निलेश राणे यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन; ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण

वाहतूक होणार अधिक सुरक्षित व सुलभ; नव्या पुलामुळे गावांमधील संपर्क मजबूत

कुडाळ तालुक्यातील आवळेगाव, हिलोॅक, निवजे आणि आंबेरी या गावांना जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण रस्त्यावरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचा लोकार्पण सोहळा कुडाळ मालवणचे आमदार माननीय निलेशजी राणे साहेब यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या पुलामुळे परिसरातील नागरिकांची वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेगवान होणार असून अनेक वर्षांपासूनची ग्रामस्थांची मागणी पूर्ण झाली आहे.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी दर्जेदार रस्ते आणि मजबूत पूल हे अत्यंत आवश्यक घटक मानले जातात. या नव्या पुलामुळे शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः पावसाळ्यात वाहतुकीस निर्माण होणाऱ्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होऊन गावांमधील संपर्क अधिक मजबूत होणार आहे. विकासाच्या दिशेने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल म्हणून या कामाकडे पाहिले जात आहे.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ. पूजा इंगवले, जिल्हा परिषद सदस्य श्री. नागेश अहिर, श्री. संजय पडते, श्री. काका कुडाळकर, पंचायत समिती सभापती श्री. मिलिंद नाईक, जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश कानडे, श्री. दीपक नारकर, श्री. विनायक राणे, श्री. अरविंद करलकर, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी पुलाच्या कामासाठी संबंधित विभागाचे अभिनंदन करत भविष्यातही ग्रामीण भागातील विकासकामांना प्राधान्य देण्याचा विश्वास व्यक्त केला. ग्रामस्थांनीही या लोकार्पण सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त करत सर्व मान्यवरांचे आभार मानले.

error: Content is protected !!