औषध वाहतूक करणारा टेम्पो पलटी; चालक किरकोळ जखमी

मुंबई-गोवा महामार्गावरील भवानी सुपर मार्केटसमोर औषधांची वाहतूक करणारा एम एच 48 एजी 7249 क्रमांकाचा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाला आहे.
सायंकाळी पाचच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पोने लोखंडी कठडे व विजेचा खांब तोडत सर्व्हिस रोडवर धडक घेत पलटी मारली. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस व सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, हा परिसर अपघातप्रवण बनत असल्याने येथे वेगमर्यादा फलक व इशारा दिवे बसवावेत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.





