आंबोली घाटात डंपर चालकाची दरीत उडी मारून आत्महत्या

खोल दरीत ड्रोनच्या साहाय्याने मृतदेहाचा शोध

आंबोली घाटात आंबोली गावठणवाडी येथील एका डंपर चालकाने मुख्य दरडीच्या ठिकाणी बाराशे फूट खोल दरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपविली. राजाराम कुडतरकर असे या तरुणाचे नाव असून सोमवारी रात्रीपासून हा डंपर आंबोली घाटातील मुख्य दरडीच्या परिसरात उभा होता. रात्रभर डंपर एकाच ठिकाणी उभा असल्याचे आणि चालक राजाराम याचा कोणताही पत्ता लागत नसल्याने डंपर मालकाला संशय आला. त्यांनी याची खबर आंबोली पोलीसांना दिल्यानंतर ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने मृतदेहाचा शोध लावण्यात यश आले आहे. घटनेचा अधिक तपास आंबोली पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!