सोन्याचीतड मालडी येथे श्री ब्राह्मण देव मंदिर वर्धापन दिन 14 मे रोजी उत्साहात साजरा होणार

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही दिनांक १४ मे २०२६ रोजी सोन्याचीतड मालडी येथे श्री ब्राह्मण देव मंदिर वर्धापन दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता श्रींच्या पूजेनं होणार असून सकाळी ११ वाजता सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी १ वाजता महाआरती तर दुपारी १.३० वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच रात्री ८ वाजता सुभद्र भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोन्याचीतड मालडी ग्रामस्थानी केले आहे.





