सिंधुदुर्ग दौऱ्यावर खासदार विनोद तावडे

खा. विनोद तावडे यांची माजी मुख्यमंत्री तथा खा. नारायण राणेंना सदिच्छा भेट

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार विनोदजी तावडे यांनी आज सिंधुदुर्ग दौऱ्यादरम्यान कणकवली येथील ‘ओम गणेश’ निवासस्थानी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे साहेबांची सदिच्छा भेट घेतली.
या प्रसंगी विनोदजी तावडे यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. राज्यातील तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने विविध संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. आगामी राजकीय घडामोडी, बूथस्तरावरील बांधणी तसेच कार्यकर्त्यांशी संवाद वाढविण्याबाबतही सकारात्मक विचारविनिमय करण्यात आला.
भारतीय जनता पक्षाची विचारधारा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या भेटीदरम्यान आमदार प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!