नरवडे इंग्लिश स्कूलच्या नवीन वास्तूचे उद्घाटन उत्साहात

नरवडे इंग्लिश स्कूलच्या नवीन वास्तूमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी
अखिल नरवडे ग्रामोद्धार संघ, मुंबई संचलित नारवडे इंग्लिश स्कूल येथे आज नवीन शाळा वास्तूच्या वास्तुशांती व उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याचा योग आला. विद्यार्थ्यांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देणारी ही वास्तू ग्रामीण भागातील शैक्षणिक विकासाला निश्चितच नवी दिशा देणारी ठरेल, असे यावेळी मत व्यक्त करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य संदेश सावंत, अध्यक्ष जगन्नाथ सावंत, सचिव विजय सावंत, खजिनदार गणेश रावराणे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश धावळ, सरपंच गणपत सावंत, उपाध्यक्ष सुरेश परब, उपाध्यक्ष सुहास सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.





