दहावी निकाल : लक्ष्मी नारायण विद्यालय बिबवणेचा निकाल ९७.७२ टक्के

बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बिबवणे येथीलच लक्ष्मी नारायण विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल 97.72 टक्के लागला. 44 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी 43 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यात प्रथम श्रेया हनुमंत साळुंके 93.20टक्के, द्वितीय वरदा विनायक जोशी 90.80 टक्के, तृतीय अनुष्का सूरज कुडपकर 88.80 टक्के यांनी यश मिळविले. संस्थाध्यक्ष राजाराम सावंत, उपाध्यक्ष आनंद गावडे, सचिव प्रकाश कुबल खजिनदार भरत सामंत ,सहसचिव विठ्ठल माळकर व अन्य संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक भास्कर पारधी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी,शिक्षक – पालक संघ पदाधिकारी – सदस्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.





