वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगावचा निकाल ९८.१४ टक्के

माणगाव येथील वासुदेवानंद सरस्वती विद्यालयाने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत ९८.१४ टक्के निकालाची नोंद करत आपली यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत विद्यालयातील संस्कृती हरी लाड हिने ९६.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला असून, मुलींनी निकालात आपला वरचष्मा राखला आहे.
​यंदा विद्यालयाचे एकूण १०८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १०६ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत संस्कृती हरी लाड (४८१ गुण, ९६.२०%) हिने प्रथम, आर्या अनिल परब (४७४ गुण, ९४.८०%) हिने द्वितीय, तर कोमल अजित परब आणि वैष्णवी गोपाळ भिसे या दोघींनी ४६५ गुण (९३%) मिळवून संयुक्तपणे तृतीय क्रमांक पटकावला आहे. विद्यार्थ्यांच्या या उज्वल यशामुळे माणगाव परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
​ विद्यार्थ्यांच्या या यशाचे श्रेय त्यांच्या जिद्दीला आणि शिक्षकवृंदाने केलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाला देण्यात येत आहे. शाळेच्या या यशाबद्दल व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक आणि पालकांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!