आचरा पंचक्रोशीतील शाळांचा100% निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आलेली होती. यात आचरा पंचक्रोशीतील शाळांचा निकाल 100% लागला आहे
1) आचरा इंग्लिश मिडीयमचा निकाल १०० टक्के.
धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित माध्यमिक शालांत परीक्षेत नामदेव शंकर कावले इंग्लिश मिडियम स्कुल आचरा चा निकाल १००%लागला आहे असून.
या प्रशालेतून 25 विद्यार्थी परीक्षेत बसले होते ते सर्वजण उत्तीर्ण झाले असून १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. या विद्यार्थ्यांमध्ये विशेष नाविन्यपूर्ण यश प्राप्त केले. प्रथम क्रमांक ॲरोन संतातोन फर्नांडिस -91.80 टक्के, द्वितीय क्रमांक कव्यांजली संदीप रावले- 88.40 टक्के तृतीय क्रमांक जुई गणेश आचरेकर 85 टक्के या विध्यार्थ्यानी प्राप्त केलेत या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रदिप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदिप परब- मिराशी, स्थानिक स्कूल कमेटी अध्यक्ष निलेश सरजोशी, खजिनदार परेश सावंत, सदस्य मंदार सांबारी, सुरेश गांवकर, दिलीप कावले, मुख्याध्यापिका मायलीन फर्नांडिस यांनी अभिनंदन केले आहे.
2) न्यू इंग्लिश स्कूल आचराचा 100 टक्के निकाल
धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कुल आचरा हायस्कूल ने दहावी परीक्षेत उज्वल यश संपादन करत 76 विद्यार्थी पैकी 74 पास होत 97.36 टक्के निकाल लागला. प्रथम क्रमांक रुद्र संजय जाधव 95.00 टक्के, द्वितीय क्रमांक उर्वशी चंद्रसेन पारकर 92.40 टक्के, तृतीय क्रमांक वेदिका पंढरीनाथ करवडकर 91.61 टक्के प्राप्त केलेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष कार्याध्यक्ष, स्थानिक स्कूल कमेटी चेअरमन, समिती सदस्य मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले आहे
3) वायंगणी हायस्कूलचा निकाल१००टक्के.
वायंगणी येथील श्री ज्ञानदीप माध्यमिक विद्यामंदिर वायंगणी हायस्कूलचे दहावी परीक्षेस बसलेले सर्वच्या सर्व 12 विद्यार्थी पास होत या शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. प्रथम यज्ञेश राजेश गोलतकर 89.20 टक्के, द्वितीय क्रमांक पुष्पक पुरुषोत्तम गोलतकर 82.40 टक्के, तृतीय क्रमांक सान्वी दिगंबर साळकर 81.40 टक्के प्राप्त केलेत या यशस्वी विद्यार्थ्यांचे स्कूल कमेटी सदस्य पदाधिकारी ,मुख्याध्यापक ,शिक्षक पालक यांनी अभिनंदन केले आहे.
4) त्रिंबक हायस्कूलचा निकाल१००टक्के.
त्रिंबक येथील जनता विद्यामंदिर त्रिंबक हायस्कूल दहावी परीक्षेस बसलेले सर्वच्या सर्व 27 विद्यार्थी पास होत या शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे.
या शाळेतून प्रथम क्रमांक वेद प्रदीप दामले 87.00 टक्के, द्वितीय क्रमांक प्रियंका किशोर त्रिंबककर 86.80 टक्के, तृतीय क्रमांक स्वराज नीलेश लोके 83.40 टक्के मिळवून यश संपादन केले आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे माध्यमिक शिक्षण समिती त्रिंबकचे अध्यक्ष श्री सुरेंद्र सकपाळ, उपाध्यक्ष श्री अशोक बागवे, कार्यवाह श्री अरविंद घाडी, तसेच सर्व कार्यकारणी तसेच मुख्याध्यापक श्री. प्रवीण घाडीगांवकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
5) आर ए यादवहायस्कूल आडवलीचा एस एससीपरीक्षेत 14पैकी 14 विद्यार्थी पासहोउन निकाल 100टक्केलागला .रेवती सुनील लाड81.80टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम आली, सानिया अनिल राणे 81.40टक्के द्वितीय, अथर्व विद्याधर तुळपुळे 80.60टक्के गुण मिळवून तृतीय





