दहावीच्या परीक्षेत कुडाळ हायस्कुलचा निकाल ९८.५५ टक्के

सुधांशु धुरी ९९.६० टक्के गुण मिळवून प्रथम
प्रशालेच्या १४ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा जास्त गुण
क.म.शि.प्र. प्रमंडळ संचलित कुडाळ हायस्कूल जुनियर कॉलेज कुडाळचा दहावीचा निकाल ९८.५५ टक्के लागला आहे. प्रशालेतून सुधांशू महेश धुरी हा ९९.६० टक्के गुण मिळवत प्रशालेतून पहिला आला आहे. तर मुलींमध्ये समृद्धी विलास सरनाईक ही ९८ टक्के गुण मिळवून पहिली आली आहे. प्रशालेचे १४ विद्यार्थी ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. तर संस्कृत विषयात सात विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. अशी माहिती प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही. एम. वराडे आणि पर्यवेक्षक आर. डी. तेली यांनी दिली आहे.
मार्चमध्ये घेणयात आलेय दहावीच्या परीक्षेत विद्यालयातून २०८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी २०५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकालाची टक्केवारी ९८. ५५ टक्के एवढी आहे. प्रशालेतून कु. समृद्धी विलास सरनाईक, कु. आर्या लक्ष्मण आगलावे, कु. वरदा भाग्यविधाता वारंग या प्रत्येकी ९८ टक्के गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. तर आयुष्य सगुण केळुस्कर याने ९७ टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळवला आहे.
मुलींमध्ये कु. समृद्धी विलास सरनाईक, कु. आर्या लक्ष्मण आगलावे आणि वरदा भाग्यविधाता वारंग या पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. सुधांशू महेश धुरी, कु. समृद्धी विलास सरनाईक, कु. आर्या लक्ष्मण आगलावे, कु. वरदा भाग्यविधाता वारंग, कु. आयुषी सगुण केळुसकर, वेदांत विवेक पंडित, श्रेयस प्रवीण खोचरे, अथर्व नागेश तवटे, आयुष आनंद पाटील, यथार्थ केशव तेली, कु. पृथ्वी केतन पडते, कु. दीप्ती गजानन प्रभू, दयानंद गजानन मेस्त्री, चिन्मय श्यामसुंदर परब हे १४ विद्यार्थी ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. संस्कृत विषयात कु. आर्या लक्ष्मण आगलावे, सुधांशु महेश धुरी, कु. समृद्धी विलास सरनाईक, कु. वरदा भाग्यविधाता वारंग, कु. आयुषी सगुण केळुस्कर, वेदांत विवेक पंडित आणि श्रेयस प्रवीण खोचरे यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यांनी अभिनंदन केले आहे.





