नेरूरची पुजा म्हाडदळकर ठरली ‘होणार स्वप्न सुंदरी मी भारताची 2026’ मानकरी

पुणे येथे झालेल्या स्पर्धेत पटकावला किताब

पुणे येथे झालेल्या ‘होणार स्वप्न सुंदरी मी भारताची 2026’ या स्पर्धेत नेरूर गावची कन्या कु. पूजा म्हाडदळकर हीने विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेमध्ये एकूण ३५ स्पर्धक सहभागी झाले होते. ही स्पर्धा ४ मे २०२६ रोजी पुणे येथील अण्णाभाऊ साठे हॉल मध्ये संपन्न झाली.
या स्पर्धेसाठी सहभागी स्पर्धकांना दोन दिवसाचे ग्रुमिंग ट्रेनिंग देण्यात आले. हे ट्रेनिंग मौलाना अब्दुल कलाम आझाद मेमोरियल हॉल कोरेगाव पार्क पुणे येथे देण्यात आले.
प्रत्येक स्पर्धकाला हेअर स्टाईल, फोटोशूट, ट्रॉफी, ग्राउंड सर्टिफिकेट, मेडल, सशे, सबटाईटटी, देण्यात आले. या शो चे डायरेक्टर नितीन झगरे यांनी हे काम पाहिले.
यापूर्वी देखील अनेक स्पर्धांमध्ये पूजा हिने यश संपादन केले आहे. रणरागिणी मॉडेलिंग शो मध्ये ३ रा क्रमांक, रोटरी प्रियेंस या स्पर्धेत २ रा क्रमांक, ओरोस येथे घेण्यात आलेल्या दीपोत्सव स्पर्धेत ३ रा क्रमांक, मालवण सुंदरी या स्पर्धेत बेस्ट रॅम्प, ऑनलाइन फॅशन शो चार रूट मिस इंद्र धनू २०२३, बेस्ट हेअर स्टाईल कोकण नाऊ चॅनेल, बेस्ट पर्सनलिटी, इनरव्हिल क्वीन सावंतवाडी बेस्ट कॅटवॉक, तसेच मळेवाड कोंडुरे बेस्ट कॅटवॉक, पिंगुळी महोत्सव २०२४ बेस्ट कॅटवॉक, कोकण समर फेस्टिवल बेस्ट कॅटवॉक आणि नितीन सागरे यांनी आयोजित केलेली महाराष्ट्राची सौंदर्यवती या स्पर्धेमध्ये दुसरी रन अप ठरली होती.

error: Content is protected !!