वेतनत्रुटी समितीच्या शिफारशी लागू न केल्यास उद्या ‘लाक्षणिक उपोषण

सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाची माहिती

वेतनत्रुटी समिती २०२४ च्या शिफारशींची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ८ मे २०२६ रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा महासंघाने दिला आहे.
​महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने २ जून २०२५ रोजी शासन निर्णय निर्गमित करूनही जिल्हा परिषद प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
​याबाबत महासंघाने यापूर्वी २५ सप्टेंबर २०२५ आणि १ जानेवारी २०२६ रोजी पत्राद्वारे, तसेच १७ मार्च २०२६ रोजी प्रत्यक्ष भेटून चर्चा केली होती.
​वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने सेवानिवृत्त ग्रामसेवकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
​जर ६ मे २०२६ पर्यंत या शिफारशींची अंमलबजावणी झाली नाही, तर पुकारलेले हे उपोषण करण्यात येईल, असे पत्र जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळकृष्ण राणे आणि उपाध्यक्ष हनुमंत गणेश प्रभू यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे. या पत्राच्या प्रती जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती हनुमंत प्रभू यानी दिली आहे.

error: Content is protected !!