आचरा येथे वादळी वाऱ्याने घराचे पत्रे उडून नुकसान

गुरुवारी सायंकाळी आचरा परीसराला वादळसदृश्य वा-याने हाहाकार उडविला यात समर्थ नगर येथील विष्णू केळकर यांच्या छप्पराचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले. वा-याची तिव्रता एवढी होती की पुढच्या पडवीचे पत्रे उडून मागच्या बाजूला छप्परावर पडले होते. सुदैवाने घरातील लोकांना कोणतीही दुखापत झाली नाही.
गुरुवारी सायंकाळी साडेचार पाच वाजण्याच्या सुमारास ढग दाटून येत आलेल्या वावटळ सदृश्य वा-यामुळे आचरा तिठाभागात धुरळा उडविल्याने व्यावसायिक, प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडविली होती. बाजारपेठ येथील अमोल इलेक्ट्रानिक दुकानाच्या छप्पराचा पत्रा उचकटून गेला होता. काही ठिकाणी झाडे उन्मळून मोडून पडल्याचे दिसून येत होते. समर्थ नगर येथील विष्णू केळकर यांच्या घराच्या छप्पराचे पत्रे उडल्याने मोठे नुकसान झाले. या वेळी घरात राहणारे अविनाश महाजन यांचे कुटूंब तसेच रंगकाम करण्यासाठी गेलेले चंदू आडवलकर आणि त्यांचा मुलगा सुदैवाने बचावले. मात्र छप्पराचे सिमेंट पत्रे उडून मोठे नुकसान झाले.

error: Content is protected !!