दहावीचा निकाल आज जाहीर; विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाने गुरुवारी दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल लवकर जाहीर होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी यासंदर्भातील अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा अखेर संपत आहे.
यंदाची दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान पार पडली होती. या परीक्षेसाठी ८ लाख ६५ हजार ७४० विद्यार्थी, ७ लाख ४९ हजार ७३६ विद्यार्थिनी तसेच १५ तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतील विद्यार्थ्यांचे निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर एकाच वेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

error: Content is protected !!