देवगड मिसळ महोत्सव युट्युब वर गाजणार

राज्य भरातील प्रसिद्ध युट्युबर आणि सोशल मीडियाची लक्षवेधी राहणार उपस्थिती

देवगड मध्ये होणाऱ्या मिसळ महोत्सवाची धूम सुरू झाली असून देवगडचा हा मिसळ महोत्सव युट्युबर गाजवणार आहे.या महोत्सवासाठी गौरेश उर्फ बंटी कांबळी,अमोल सावंत,पराग कुबल (स्वर्गीय कोकण),सिद्धेश चव्हाण ,अक्षय नेरूरकर,आशिष नाटळकर (सुवर्ण कोकण),ओमकार बांदकर (Insta – देवाचा गड देवगड), श्रावणी संकेत हे नामवंत युट्युबर खास या महोत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत. त्याच प्रमाणे स्थानीक युटुब आणि सोशल मीडिया मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्यामुळे हा महोत्सव खवय्यांसाठी पर्वणी ठरणारच आहे. मात्र हा महोत्सव युट्युब च्या माध्यमातून सोशल मीडियावर गाजणार हे नक्कीच आहे.

देवगड प्रतिनिधी

error: Content is protected !!