तेंडोली-भोमवाडी येथील श्री देवी अनलादेवीचा वर्धापन दिन सोहळा २२ पासून

तालुक्यातील तेंडोली-भोमवाडी येथील श्री देवी अनलादेवीचा वर्धापन दिन सोहळा २२ ते २४ एप्रिल या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. २२ रोजी सकाळी ८ वाजता श्री जगदंबा अनलादेवी चरणी लघुरूद्राभिषेक, महापूजा, दुपारी १ वाजता नैवेद्य, प्रसाद, सायंकाळी ४ वाजता श्री भुमिका दशावतार मंडळ नितीन आसयेकर प्रस्तुत (मळगाव) यांचे नाटक, सायंकाळी ७ वाजता खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा. दि. २३ रोजी सकाळी ८ वाजता श्री देवी चरणी अभिषेक, ९ वाजता द्वादश पाठात्मक नवचंडी (पल्लवीत) कुमारीपूजन, कुष्मांड बळी, सांगता आशीर्वाद, दुपारी १ वाजता नैवेद्य, प्रसाद, सायंकाळी ५ वाजता रामकृष्ण हरी महिला भजन सेवा संघ (तेंडोली, बुवा-जुई राऊळ) यांचे भजन, ७ वाजता मोरेश्वर मंडळ (नेरुर) यांचे भजन, रात्री ८ वाजता श्री जैतीर कृपा मंडळ (तुळस-वेंगुर्ले) यांचे भजन, ९ वाजता विश्वकला मंच (सावंतवाडी) यांचा व्हरायटी शो,
दि. २४ रोजी सकाळी ८ वाजता श्री अनलादेवी चरणी सार्वजनिक लघुरूद्र, अभिषेक, महापूजा, १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, आरती, नैवेद्य, गाऱ्हाणे, प्रसाद, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता किर्तनकार-स्नेहलदिप सामंत (वालावल-हुमरमळा) यांचे किर्तन, ७.३० वाजता ग्रामस्थांची भजने, रात्री ९ वाजता पालखी प्रदक्षिणा, १० वाजता श्री नाईक मोचेमाडकर दशावतार मंडळ (मोचेमाड) यांचे नाटक होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री अनलादेवी सेवा मंडळ (तेंडोली-भोमवाडी) यांनी केले आहे.





