कुडाळ मध्ये १८ रोजी महानाट्य ‘शिवराज भूषण’

मालवण-कुडाळच्या ८० कलाकारांच्या संचात

इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा श्री शिवराज मंचचा प्रयत्न

शिवछत्रपती शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची पताका, जाज्वल्य आणि वैभवशाली पराक्रम हिंदुस्थानभर पोहोचविण्याचे काम केले ते कवी भूषण यांनी. यावर आधारित श्री शिवराज मंच मालवण यांनी ‘शिवराज भूषण’ हे महानाट्य रंगमंचावर आणले आहे. या महानाट्याचा प्रयोग शनिवार दि. १८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ठीक ७.३० वाजता कुडाळच्या बाबा वर्दम स्मृती रंगमंचावर होणार आहे. छत्रपती शिवरायांच्या वैभवशाली कारकिर्दीत कुडाळचा उल्लेख महत्वाचा आहे. त्याच कुडाळ मध्ये हे महानाट्य करायला मिळते आहे, याचा आनंद असून या नाटकाला शिवप्रेमीनी उपस्थित राहावे असे आवाहन भूषण साटम यांनी केले आहे. कुडाळ येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री शिवराज मंच, मालवण यांनी या शिवराज भूषण या महानाट्याची निर्मिती केली आहे. त्याबद्दल सांगताना भूषण साटम म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे नाव माहीत नाही असा माणूस आपल्या महाराष्ट्रात सापडणे मुश्किल. पण महाराजांची हिंदवी स्वराज्याची पताका, जाज्वल्य आणि वैभवशाली पराक्रम हिंदुस्थानभर पोचविण्याचे काम कवी भूषण यांनी केले. उत्तर भारत मधील उत्तर प्रदेश जवळच्या कानपूर जवळील त्रिविक्रमपूर नावाच्या छोट्याश्या गावातला हा कवी. महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा ऐकून इ.स. १६७१ मध्ये थेट महाराजांना भेटायला दुर्गराज रायगड किल्ल्यावर आला आणि आपल्या प्रातिभेने महाराजांच्या राजकवीचा दर्जा प्राप्त केला. महाराजांसोबत रायगड वर राहून शिवभूषण आणि शिवाबावनी या ब्रज भाषेतील अजोड काव्यग्रंथाची त्यांनी निर्मिती केली. हे काव्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा समकालीन कवीने लिहिलेला खराखुरा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर लिहिलेल्या ग्रंथमंध्ये तब्बल ३८२ कविता रुपी छंद आहेत. अशाप्रकारच्या छंदांवरती आधारित भारतातील पहिलं नाटक आहे असा दावा श्री. साटम यांनी यावेळी केला.
मालवण आणि कुडाळ मधील तब्बल ८२ कलाकार या महानाट्यामध्ये काम करत आहेत. यामध्ये चाट जीपीटी, एआय, भव्य एलईडी स्क्रीन यांचा वापर केलेला आहे. लढाया, नृत्य या म्हणत्यात पाहायला मिळतात. शिवछत्रपतींचा गौरवशाली इतिहास कवी भूषणांच्या २१ निवडक छंदांच्या माध्यमातून साकार करण्यात आला आहे, असे श्री. साटम यांनी सांगितले.
कुडाळशी असलेले या महानाटयचे नाते श्री. साटम यांनी यावेळी अधोरेखित केले. ऑक्टबर १६६४ मध्ये माणगाव खोऱ्यात लढाई झाली होती. इतिहासात खवासखानाची लढाई म्हणून ती प्रसिद्ध हाये. त्या लढाईत खुद्द छत्रपती शिवरायांनी नेतृत्व केले होते. या लढाईत खावयास खानाचा पराभव झाल्यानंतर शिवाजी महजर मालवण मध्ये गेले. कुरटे बेटावर जलदुर्ग बांधायचे निश्चित झाले आणि किल्ले सिंधुदुर्ग आकाराला आला. किल्ले सिंधुदुर्गचे जन्मकहाणी संगर हा प्रसंग आणि हि लढाई या महानाट्यात पाहायला मिळणार असल्याचे श्री. साटम यांनी सांगितले.
श्री. साटम पुढे म्हणाले, आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या अडचणी येतात. विद्यार्थ्यांना तर केवढे मोठमोठे अभ्यासक्रम शिकावे लागतात, प्राविण्य मिळवावे लागते. कधी यश तरी कधी अपयश येते. पण आपले मन, आपला आत्मविश्वास सुदृढ नव्हे तर बुलंद करण्याचे आणि आपल्याला घडविण्याचे काम है शिवकाव्य करते. आपल्याला प्रेरणा देऊन आपल्या अडचणीवर मात करण्याचे सामर्थ्य हे काव्य देते. आपला देव, देश आणि धर्म आणि आपली संस्कृती किती सर्वोच्य आणि सर्वोतम होती आणि आहे….. है काव्य ऐकून, वाचून आपण समजतो. महाराजांचा पराक्रम जगभर कसा पसरला होता आणि छत्रपती शिवाजी महाराज केवळ हिंदुस्थानातच नव्हे तर जगभरात कसे कीर्तिवंत होते हे या काव्यातून उलगडते,
आपल्याला अपयश विचलित करते, निराश करते. परंतु अपयशावर मात करून नवा इतिहास घडवायचा असेल, आपले मन बुलंद करायचे असेल आणि यशवंत व कीर्तिवंत व्हायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांना विररसाने उलगडणारे हे काव्य ऐकावे लागेल, आचरणावे लागेल. हे काव्य अनुभवण्याची संधी रसिकांना श्री शिवराज मंच, कुडाळ मध्ये उपलब्ध करून देत आहे. येत्या शनिवारी १८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता शिवराज भूषण हे महानाट्य कै बाबा वर्दम स्मृती रंगमंच, कुडाळ येथे होत आहे. मालवण-कुडाळ मधील ८० हुन अधिक शिवप्रेमी कलाकारांनी हे साकारले आहे. विद्यार्थ्यांसाठी तिकीट दरामध्ये विशेष सवलत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हि नाट्यकृती पाहण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री शिवराज मंच मालवणचे भूषण साटम यांनी केले आहे.
या नाटकाचे आतापर्यंत मालवणमध्ये चार, रत्नागिरी आणि वेंगुर्लेत प्रत्येकी एक असे एकूण सहा प्रयोग झाले आहेत. लवकरच माणगाव मध्ये शिव शौर्य स्मारक उभारण्यात येईल असेही भूषण साटम यांनी शेवटी सांगितले. या पत्रकार परिषदेला त्याच्या सोबत संजय शिंदे, समीर शिंदे आणि छत्रपती शिवरायांची भुमीका साकारणारे कलाकार किशोर सरनोबत उपस्थित होते.

error: Content is protected !!