कळसुली दिंडवणे वाडी (श्रीनगर) शिक्षण संघ मुंबई सिंधुदुर्ग शिक्षण संस्थेची विशेष सर्व साधारण सभा १९ एप्रिल रोजी

कळसुली दिंडवणे वाडी (श्रीनगर) शिक्षण संघ मुंबई सिंधुदुर्ग शिक्षण संस्थेची विशेष सर्व साधारण सभा रविवार १९ एप्रिल रोजी कोतवाल उद्यान दादर पश्चिम प्लाझा सिनेमा समोर सकाळी दहा वाजता घेण्यात येणार आहे. सदर सभा एमडी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येईल. या सभेत संस्थेची आज पावतो वाटचालीबाबत चर्चा करणे व निर्णय घेणे संस्थेच्या कोषागरात आर्थिक जमा रक्कमेबाबत निर्णय घेणे, आदी विषय सादर होणार आहेत. तरी सर्व सभासद, संस्थेशी संबंधित व्यक्ती व हितचिंतक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सचिव गजानन घाडीगावकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!