जिल्हाधिकाऱ्यांनी कणकवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला केले अभिवादन

प्रांताधिकारी व तहसीलदार यांची देखील उपस्थिती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कणकवली बुद्ध विहार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, ममता तांबे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!