माननीय नारायण राणे साहेब यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा.

स्नेहसिंधू आश्रमातील बांधवांसाठी कार्यकर्त्यांकडून वॉटर प्युरिफायर ची अमूल्य भेट.

माननीय खासदार तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण लक्ष्मीबाई तातू राणे साहेब…. यांचा अमृत महोत्सवी शुभारंभ वाढदिवस कणकवली तालुक्यातील कार्यकर्त्यांकडून उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला.

या निमित्ताने कार्यकर्त्यांनी दोन दिवस आधी फोंडाघाट येथील जीवन आनंद संस्था आणि स्नेहालय (अहिल्यानगर) संचालित स्नेहसिंधू आश्रमाला भेट दिली. आश्रमातील बांधवांच्या गरजा जाणून घेतल्यानंतर, त्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने वॉटर प्युरिफायरची जिल्हा परिषद गटा मार्फत अमूल्य भेट देण्यात आली.

या उपक्रमामुळे स्नेहसिंधू आश्रमातील रहिवाशांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होणार असून, कार्यकर्त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 वॉटर प्युरिफायर आश्रमाला प्रदान करण्याच्या या छोटेखानी कार्यक्रम प्रसंगी  जि. प. गटातील स्थानिक नेते व पंचायत समिती सदस्य पवन भालेकर, लोरे सरपंच अजय रावराणे, तन्वी मोदी, विश्वनाथ जाधव, अलंकार रावराणे, दर्शना पेडणेकर, चंदू गुरव, प्रकाश वाघेरकर, मंगेश नेवगे, अजय चिक्के ,मिलिंद लाड, मिहीर मराठे, नरेश गुरव, दामोदर नारकर, विलास मराठे,सुरेश एकावडे,निलेश लाड, भाई तेली  संतोष पारकर  रुपेन चव्हाण, मंदार मराठे , कुमार नाडकर्णी आदी मान्यवरांची उपस्थिती होती....फोंडाघाट येथील कुमार मेडिकल चे कुमार नाडकर्णी यांनी आश्रमसाठी लागणारे अत्यावश्यक मेडिकल साहित्याची गरज त्यांचे मेडिकल मार्फत पूर्ण केली जाईल असे आश्रम व्यवस्थापन प्रतिनिधींना यावेळी सांगितले....आश्रमाच्या स्टाफ अनुजा सावंत आणि युवा कार्यकर्ते हर्ष हळदणकर हे यावेळी उपस्थित होते. 
   वाढदिवसासारख्या आनंदाच्या प्रसंगी समाजोपयोगी कार्य करण्याचा हा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

error: Content is protected !!