भाजपा नगरसेविका आर्या राणे यांच्या इशाऱ्यानंतर अखेर कणकवली नगरपंचायत च्या स्वागत फलकाची तातडीने दुरुस्ती

मंत्री उदय सामंत व नगरपंचायत सत्ताधाऱ्यांवर केली होती उपरोधी टीका
कणकवली नगरपंचायत कडून आर्या राणे यांच्या टिकेची गांभीर्याने दखल
कणकवली नगरपंचायत चा गड नदी पुलावर लावलेला इलेक्ट्रिक स्वागत फलक अखेर भाजपा नगरसेविका आर्या राणे यांच्या बातमीनंतर तात्काळ सुरू करण्यात आला आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नगरपंचायत निवडणुकीच्या वेळी या स्वागत फलकाच्या मुद्द्यावरून नगरपंचायतीच्या तत्कालीन सत्ताधारी भाजपावर टीका केली होती. या टीकेच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या नगरसेविका आर्या राणे यांनी याबाबत उपरोधी टीका करत कणकवली नगरपंचायत च्या सत्ताधाऱ्यांना लक्ष केले होते. मात्र त्यानंतर काही दिवसातच हा स्वागत फलक सुरू करण्यात आल्याने आर्या राणे यांनी समाधान व्यक्त केले आहे. कणकवली नगरपंचायतीमध्ये सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर भाजपा यापुढे देखील असाच बारकाईने लक्ष ठेवणार असून या फलका मधील स्वा हा शब्द बंद असताना उदय सामंत यांनी टीका केली होती. मात्र सत्ताधाऱ्यांना नगरपंचायत मध्ये आता स्वाहा करू देणार नसल्याचेही आर्या राणे यांनी म्हटले आहे.






