रोटरी तर्फे डायबेटीक रेटिनोपॅथी मोफत स्क्रीनिंग कॅम्प

रोटरी क्लब मालवण व आर सी सी क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने
मधुमेहग्रस्त रुग्णांची नेत्रपटल (डोळ्याचा पडदा) ची OCT तपासणी मोफत करण्यात येणार आहे. यासाठी रोटरी क्लब ऑफ सांगली मिडटाऊन व सुदर्शन आय हॉस्पिटल सांगली यांची मोबाईल व्हॅन उपलब्ध असणार आहे. या तपासणीच्या माध्यमातून मधुमेहामुळे येणारे अंधत्व निदान करून ते टाळता येण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येईल. मधुमेह असलेल्या ५० वर्षे वरील व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घ्यावा.
दिनांक – बुधवार दि. २५ मार्च २०२६
वेळ – सकाळी ८ पासुन
स्थळ – लिमये हॉस्पिटल, मालवण
नावनोंदणी आवश्यक, फक्त पहिल्या ६० रुग्णांची तपासणी होईल.
संपर्क — लिमये हॉस्पिटल
२५२२६६, ७०५७९०६६८१




