रमजान ईद निमित्त राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

बुवा संतोष कानडे यांनी भेट घेऊन शुभेच्छा देत घेतला शीरखुर्मा चा आनंद

कणकवली/प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रमजान ईदच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्यावर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.सामाजिक,सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती त्यांच्या ‘कामयाब’ या निवासस्थानी भेट देऊन त्यांना ईदच्या शुभेच्छा देत आहेत.याच पार्श्वभूमीवर भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गचे अध्यक्ष तसेच राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष बुवा श्री.संतोष कानडे यांनीही अबिद नाईक यांची त्यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेतली.यावेळी त्यांनी ईदच्या शुभेच्छा देत शीरखुर्मा चा आनंद घेतला.या भेटीप्रसंगी कणकवली नगरसेवक बंडू हर्णे,भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गचे संचालक निलेश ठाकूर तसेच सहखजिनदार मयूर ठाकूर हे देखील उपस्थित होते.सर्वांनी एकत्र येत ईदच्या सणानिमित्त बंधुभाव आणि एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित केले.

error: Content is protected !!