खारेपाटण येथे बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन

यश कम्युटर अकॅडमी चे संचालक मंगेश गुरव व मेघना गुरव यांच्यामार्फत ग्राहकांना मिळणार बँकेच्या विविध सेवा
खारेपाटण येथे बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन बँक शाखा अधिकारी शिवतारे यांच्या शुभ हस्ते नारळ वाढवून करण्यात आले.
यश कम्युटर अकॅडमी चे संचालक मंगेश गुरव व मेघना गुरव यांनी सुरू केलेल्या या नवीन व्यवसायाला विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. बँकेच्या विविध सेवा यानिमित्ताने ग्राहकांना येथे उपलब्ध होणार असून चांगली सेवा मिळण्याच्या दृष्टीने ग्राहक सेवा केंद्र खारेपाटण पंचक्रोशीतील ग्राहकांना फायद्याचे ठरेल आहे श्री शिवतारे यांनी सांगितले. बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहक सेवा केंद्राचे सर्व स्तरातून समाधान व्यक्त होतं आहे.





