भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या माध्यमातून सवलतीच्या दरात सायकल, एलईडी टीव्ही वाटपाचा शुभारंभ
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातुन ५० टक्के सवलतीच्या दरात एलईडी टीव्ही आणि सायकल वाटपाचे उद्घाटन आज १२ एप्रिल रोजी सकाळी प्रदेश सदस्य तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, कुडाळ मंडळ अध्यक्ष विनायक राणे, खरेदी-विक्री संघ अध्यक्ष दीपक नारकर, मालवण तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, युवामोर्चा मंडळ अध्यक्ष पप्या तवटे, रुपेश कानडे, महिला मोर्चा मंडल अध्यक्ष आरती पाटील, शहर महिला मोर्चा पदाधिकारी अदिती सावंत, अश्विनी वैद्य, सखू आकेरकर, शहर अध्यक्ष राकेश कांदे, शक्ती केंद्रप्रमुख उदय नारळीकर, चंदन कांबळी, नगरसेवक गणेश भोगटे, अवधूत सामंत, कैलास यादव, सुनील गायकवाड, सवलत योजना कार्यक्रम प्रमुख कैलास राणे आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निलेश राणे यांच्या माध्यमातून ५० टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध असणाऱ्या सायकल आणि एलईडी टीव्हीसाठी इच्छुक लाभार्थींनी आपल्या गावातील भाजपा बुथ अध्यक्ष किंवा शक्तिकेंद्रप्रमुख यांच्याकडे २५ एप्रिलपर्यंत आगाऊ नावनोंदणी करावे असे आवाहन योजना कार्यक्रम प्रमुख कैलास राणे यांनी केले आहे.
प्रतिनिधी, कुडाळ