कोकण नाऊ कणकवली महोत्सवात ‘भव्य जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धेचा’ थरार

२८ फेब्रुवारीला रंगणार महासोहळा
कणकवली/मयूर ठाकूर ‘कोकण नाऊ चॅनेल’ आयोजित ‘कोकण नाऊ कणकवली महोत्सवा’च्या निमित्ताने जिल्हाभरातील नृत्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे.या महोत्सवात येत्या शनिवार,२८ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धेचे‘ आयोजन करण्यात आले आहे.२७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.दररोज सायंकाळी ४:०० ते रात्री १०:०० या वेळेत नागरिक फूड फेस्टिवलं आणि फन फेअरचा आनंद घेऊ शकतील.या महोत्सवात ऑटोमोबाईल,प्रॉपर्टी, फर्निचर, इंटिरियर, सोलर, लाईफ स्टाईल आणि हॅन्डलूम-हॅन्डीक्राफ्ट अशा विविध क्षेत्रांचे स्टॉल्स आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत.
शनिवारी होणाऱ्या या नृत्य स्पर्धेचे दोन वयोगटांत विभाजन करण्यात आले असून विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत:
✅१३ वर्षांवरील वयोगट:
प्रथम क्रमांक: ५००० रुपये
द्वितीय क्रमांक: ३,००० रुपये
तृतीय क्रमांक: २,००० रुपये
✅१३ वर्षांखालील वयोगट:
प्रथम क्रमांक: ३,००० रुपये
द्वितीय क्रमांक: २,००० रुपये
तृतीय क्रमांक: १,००० रुपये.
ही स्पर्धा उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदान,कणकवली येथे पार पडणार आहे.जास्तीत जास्त कलाकारांनी आपल्या कलेचे सादरीकरण करावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सहभागासाठी संपर्क:
इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी ९३७०४४०८९३ किंवा ८४०८९२९९२३ या क्रमांकावर संपर्क साधावा.
✅या एकेरी नृत्य स्पर्धेसाठी नियमावली खालीलप्रमाणे :-
1)सदर स्पर्धा 13 वर्षाखालील आणि 13 वर्षांवरील अश्या दोन गटांट आहे.13 वर्षा खालील गटातील सर्व स्पर्धाकांनी आधार कार्ड घेऊन येणे आवशक आहे.
2)गाण्याची वेळ जास्तीत जास्त पाच मिन असावी. पाच मिन पेक्षा कमीत कमी कितीही चालेल.
3)स्पर्धाकांनी कुठल्याही गाण्यावर किव्वा कोणत्याही विषयावर नृत्य सादर केले तरी चालेल.
4)स्पर्धा ठीक सायंकाळी 6 वाजून 45.मिनी सुरु होईल.स्पर्धा सुरु होण्यापूर्वी सर्व स्पर्धाकांनी एक तास अगोदर येणे बंधनकारक आहे.
5)स्पर्धकांनी किव्वा त्यांच्या पालकांनी परीक्षकांशी कोणतीही हुज्जत घालू नये.असे आढळल्यास योग्य ती कठोर भूमिका घेण्यात येईल.
6)परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
7)स्पर्धा संपल्यावर लगेचच बक्षीस वितरण केले जाईल.
8)सदर स्पर्धा ही रात्रौ ठीक 10.30 पर्यंत संपवायची असल्याने स्पर्धाकांनी उशिरा येऊ नये.
9)स्पर्धेसाठी आवश्यक तो बदल करण्याचे अधिकार आयोजकांकडे राखून ठेवण्यात आले आहेत.





