गणपत मसगे याना आदिवासी गिरिजन पुरस्कार प्रदान
सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते श्री.मसगे यांनी सपत्नीक स्वीकारला पुरस्कार
ठाकर आदिवासी लोककलेबाबत राज्य शासनाकडून गौरव
निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाचे सुपुत्र गणपत मसगे यांना महाराष्ट्र शासनाचा आदिवासी गिरिजन हा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगट्टीवार यांच्या हस्ते गणपत मसगे यांनी सपत्नीक हा पुरस्कार स्वीकारला. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
गणपत मसगे यांनी आदिवासी समाजाच्या लोककला व आदिवासी समाजासाठी केलेले प्रेरणादायी कार्य, तसेच आदिवासी रूढी, परंपरा संपूर्ण जगासमोर आणून देणारे ठाकरवाडी म्युझियम उभारत यांनी आदिवासी ठाकर समाजाची आदीम संस्कृती जगासमोर दाखवली . यांच्या उत्तुंग कार्याला व सिंधुदुर्गातील ठाकर या आदिवासी समाजाला मिळालेला हा पहिला खराखुरा आदीवासी मानाचा पुरस्कार मानला जात आहे. सन २००५ मध्ये गणपत मसगे यांना आदिवासी लोककलेतील कळसूत्री बाहुल्या या कलाप्रकारासाठी भारत सरकारकडून राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. यानंतर ठाकर आदिवासी समाजाच्या या कलांना आदिवासी गिरीजन म्हणून मिळालेला हा पुरस्कार सार्थकी ठरला आहे.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.