सावंतवाडीत भाजपची भव्य तिरंगा रॅली; विशाल परब यांच्या नियोजनाची दीपक केसरकरांकडून मुक्तकंठाने प्रशंसा!

देशभक्तीच्या उत्साहाने सावंतवाडी आज अक्षरशः तिरंगामय झाली! स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. हातात तिरंगा… ओठांवर भारत माता की जयचा जयघोष… आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सावंतवाडीच्या रस्त्यांवर देशभक्तीचा जल्लोष पाहायला मिळाला.
विशेष म्हणजे, या रॅलीने सावंतवाडीच्या राजकीय वर्तुळाचेही लक्ष वेधून घेतले. कारण एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर आणि भाजपचे युवा नेते विशाल परब हे एकाच व्यासपीठावर आणि एकाच तिरंगा रॅलीत सहभागी झाले.
मात्र, या रॅलीतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो दीपक केसरकर यांनी भाजप युवा नेते विशाल परब यांच्या केलेल्या कौतुकाचा!
रॅलीच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल दीपक केसरकर यांनी विशाल परब यांचे विशेष आभार मानले. विशाल परब यांनी रॅलीच्या आयोजनासाठी घेतलेली मेहनत, केलेले नियोजन आणि कार्यकर्त्यांना एकत्रित करण्याची भूमिका याबद्दल केसरकर यांनी स्तुतीसुमने उधळली.
राजकारणातील मतभेद बाजूला ठेवून देशभक्तीच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचा हा क्षण उपस्थितांसाठीही विशेष ठरला.या रॅलीत पालकमंत्री नीतेश राणे,आमदार दीपक केसरकर,भाजप युवा नेते विशाल परब,भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर परब,भाजप जिल्हा महिला आघाडी प्रमुख श्वेता कोरगावकर,जि.प.सदस्य संदीप गावडे,
नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले,उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यासह भाजपचे पदाधिकारि कार्यकर्ते उपस्थित होते.
विशाल परब यांच्याकडे भाजपच्या युवा नेतृत्वाची जबाबदारी अधिकाधिक ठळक होत असताना, एवढ्या मोठ्या तिरंगा रॅलीचे प्रभावी नियोजन करून त्यांनी पुन्हा एकदा आपली संघटन क्षमता दाखवून दिल्याची चर्चा आता सावंतवाडीत रंगली आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने एकत्र आणणे, रॅलीचे नियोजनबद्ध आयोजन करणे आणि संपूर्ण कार्यक्रमाला देशभक्तीचा रंग देणे, या सगळ्यामुळे विशाल परब यांच्या संघटन कौशल्याची जोरदार चर्चा झाली.
विशेष म्हणजे, राजकीयदृष्ट्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये असणारे दीपक केसरकर आणि विशाल परब यांची एकत्रित उपस्थिती हीदेखील सावंतवाडीच्या राजकारणातील चर्चेचा विषय ठरली.
विरोधक एकत्र आले नाहीत, तर देशासाठी एकत्र आले!
आणि याच भावनेतून सावंतवाडीच्या तिरंगा रॅलीने एक वेगळाच राजकीय आणि सामाजिक संदेश दिला.
दीपक केसरकरांनी विशाल परब यांच्या नियोजनाचे केलेले कौतुक…
विशाल परब यांचा उत्साह…
भाजप कार्यकर्त्यांचा प्रचंड सहभाग…
आणि हातात डौलाने फडकणारा तिरंगा…
या सगळ्यामुळे सावंतवाडीतील ही तिरंगा रॅली केवळ देशभक्तीचा कार्यक्रम न राहता भाजपच्या युवा नेतृत्वाची ताकद आणि विशाल परब यांच्या वाढत्या संघटनात्मक प्रभावाची झलक दाखवणारी ठरली.
सावंतवाडीच्या राजकारणात समीकरणे बदलत आहेत का?
हा प्रश्न या रॅलीनंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मात्र एक गोष्ट स्पष्ट झाली…
तिरंग्याच्या साक्षीने सावंतवाडीच्या राजकारणातील दोन टोकाची नावं एकाच रॅलीत आली आणि विशाल परब यांच्या उत्कृष्ट नियोजनाला मिळालेली दीपक केसरकरांची दाद हा आजच्या कार्यक्रमाचा सर्वाधिक चर्चेचा क्षण ठरला!

error: Content is protected !!