महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार अनंत पिळणकर यांचा झंजावती प्रचार दौरा

फोंडाघाट मध्ये घेतल्या घरोघरी मतदारांच्या भेटी
मतदारांमधून पिळणकर व पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांना उस्फूर्त प्रतिसाद
लोकांना सातत्याने दिली जाणारी तीच तीच आश्वासने व या आश्वासनांची पूर्तता कधीही न करणे हे सत्ताधाऱ्यांचे काम असून, जनता सत्ताधाऱ्यांच्या या आश्वासनांना आता कंटाळल्याने फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघामध्ये माझा विजय निश्चित आहे असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार अनंत पिळणकर यांनी काढले. कणकवली फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघामध्ये अनंत पिळणकर यांनी झांजावती प्रचार दौरा केला. या प्रचार दौऱ्यादरम्यान त्यांनी मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेत संवाद साधला. जनतेला मी शब्द दिला असून निवडून आल्यानंतर विकासाच्या माध्यमातून हा शब्द पूर्ण केला जाईल अशी ग्वाही श्री पिळणकर यांनी याप्रसंगी दिली. गेली वीस वर्षे या मतदारसंघांमध्ये मी काम करत असल्याने मला जनता ओळखते. त्यामुळे माझी ओळख जनतेला पटवून द्यावी अशी वाटत नाही.
जनतेच्या घरोघरी गाठीभेटी घेत असताना जनतेचे अनेक प्रश्न माझ्यासमोर मांडले जात आहेत. अनेक वर्ष प्रलंबित राहिलेली विकास कामे ही मी विजयी झाल्यानंतर माझ्या माध्यमातून मी पूर्ण करून देईन अशी ग्वाही देखील मी मतदारांना दिली आहे. कारण विकासासाठी जनता आपल्याला मतदान करत असते. व हे मतदान निश्चितपणे मी वाया जाऊ देणार नाही. असे देखील श्री पिळणकर यांनी या प्रसंगी सांगितले. यावेळी ठिकठिकाणी अनंत पिळणकर यांचे औक्षण करून स्वागत देखील करण्यात आले.सोबत पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुंदर पारकर गुरुजी, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आबू पटेल, अनिल पटेल, सुरेश टक्के, सौ अवसरे, संजना कोलते. राष्ट्रीय काँग्रेसचे संतोष टक्के, शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे युवक चे अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, विभाग विभाग प्रमुख सिद्धेश राणे, शिवसेनेचे लोरे शाखाप्रमुख निलेश राणे, राष्ट्रवादी विभाग प्रमुख रमेश राणे, उत्तम रेवडेकर तेली राजू वाघाटे प्रीतम राणे, आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.





