खारेपाटण-तळेरे महायुती मधील जि. प आणि पं. स. उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ संपन्न

खारेपाटण केदारेश्वर मंदिर व कालभैरव मंदिर येथे श्रीफळ ठेवून उमेदवारांनी घेतला आशीर्वाद

शिवसेना उपनेते संजय आंग्रे, दिलीप तळेकर, मंगेश गुरव यांची उपस्थिती

महायुतीतील जि. प साठी – प्राची इस्वलकर, पं. स. साठी – गुरुप्रसाद शिंदे व राजेश जाधव आहेत निवडणूक रिंगणात

महायुतीतील खारेपाटण जि. प व पं. स मतदार संघ तसेच तळेरे पं. स. मतदार संघातील निवडणूक रिंगणात असणाऱ्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज दि. 23जानेवारी रोजी खारेपाटण येथे करण्यात आला. खारेपाटण चे आराध्य दैवत केदारेश्वर व कालभैरव मंदिरात श्रीफळ ठेवून व गाऱ्हाने घालून उमेदवारांनी आशीर्वाद घेतले. महायुती भाजपा मधील खारेपाटण जि. प साठी – प्राची इस्वलकर, शिवसेना शिंदे गट पं. स. साठी – गुरुप्रसाद शिंदे व भाजपा तळेरे पं. स मधून राजेश जाधव हे निवडणूक रिंगणात आहेत. खारेपाटण – तळेरे जि. प आणि पं. स निवडणुकीत महायुती चाच विजय होणार असा विश्वास यावेळी उमेदवारांनी व्यक्त केला. तसेच निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्नशील असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले. या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी महायुती मधील शिवसेना उपनेते संजय आंग्रे, भाजपा तालुकाध्यक्ष – दिलीप तळेकर, शिवसेना तालुका प्रमुख – मंगेश गुरव, खारेपाटण उपसरपंच – महेंद्र गुरव, खारेपाटण चिंचवली बूथ अध्यक्ष – सूर्यकांत भालेकर, माजी पं. स. सदस्या -तृप्ती माळवदे, माजी शेर्पे सरपंच – निशा गुरव (शेलार), मनाली होनाळे, क्षितिजा धुमाळे, आरती गाठे, गौरी शिंदे, पिसे काकी, शेट्ये काकी, जयदीप देसाई, सुधाकर ढेकणे, मंगेश ब्रह्मदंडे, शेखर शिंदे, प्रणय गुरसाळे, कुरंगवणे सरपंच -पप्पू ब्राह्मदंडे, एकनाथ कोकाटे, शैलेश सुर्वे, श्री. कोकाटे, किशोर माळवदे, अवी गाठे, देवानंद इस्वलकर, प्रमोद जाधव, श्रीकृष्ण बाणे, संदीप दळवी, सुहास राऊत, दिनेश मुद्रस, मयुरेश लिंगायत, चिन्मय तळेकर, अरुण कर्ले, मंगेश कांबळे, उदय बारसकर, रामा पांचाळ, राजन गाठे, तथा खारेपाटण, तळेरे संजय लाड, रवींद्र लाड, महायुतीचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी या प्रचार शुभारंभ प्रसंगी उपस्थित होते.

error: Content is protected !!