कणकवलीत एक दिवस छोट्यांचा, धम्माल, मस्ती उद्या

खाऊ गल्ली सह, किलबिल जल्लोष व लहानग्यांसाठी अनेक मनोरंजनाचे उपक्रम
समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजन
पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते होणार उद्घाटन
समीर नलावडे मित्र मंडळाच्या वतीने एक दिवस छोट्यांसाठी, खाऊगल्ली व किलबिल जल्लोष या लक्षवेधी उपक्रमाचे आयोजन उद्या 24 जानेवारी रोजी चौंडेश्वरी मंदिरानजीक गणपती साना येथे करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सायंकाळी 5.30 वाजता या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. खाणे व गाणे ही या कार्यक्रमाची टॅग लाईन असणार आहे. मुंबईतील नामवंत गायकांचा संगीताचा नजराना किलबिल जल्लोष च्या माध्यमातून सादर केला जाणार आहे. तसेच लहान मुलांना खाऊ साठी एक मोफत कुपन दिले जाणार आहे. लहान मुलांना आकर्षण असणारे वेगवेगळ्या प्रकारचे कार्टून या ठिकाणी असणार आहेत. लहान मुलांना मज्जा मस्ती करता यावी , थोडा विरंगुळा मिळावा या उद्देशाने खाऊ गल्ली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल मोफत लावण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. झोपाळे, पाळणी, अनेक खेळणी देखील या ठिकाणी असणार आहेत. स्थानिकांना, बचतगटाना स्टॉल साठी प्राधान्य देण्यात येणार देणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असणार आहे. या खाऊ गल्ली मध्ये पिझा, पाणीपुररी, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, शोरमा, चायनीज, असे अनेक स्टॉल असणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. नलावडे यांनी केले आहे.





