कुडाळचा सुपुत्र ऋतुराज राणेचे एमबीबीएस परीक्षेत सुयश
कुडाळ : डॉक्टरकीचा पेशा घरातच असलेल्या कुडाळ-सांगिर्डेवाडी येथील डॉ. राजन राणे यांचा सुपुत्र ऋतुराज राणे याने नुकताच मुंबईच्या केईएम रुग्णालयातून एमबीबीएस परीक्षेत पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला. ओरोस येथील डॉन बॉस्को हायस्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून ऋतुराज याने सांगली येथे मेडिकलसाठी प्रवेश घेतला होता. सांगली येथे सुद्धा मेडिकल प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील नीट परीक्षेत ऋतुराज राणे बसला होता. सांगली विभागात त्याने प्रथम क्रमांक मिळवून त्यानंतर ऋतुराजने मुंबईच्या केईएम रुग्णालयातून पदवीसाठी प्रवेश घेतला. यावर्षी तो याच रुग्णालयातून पहिल्या श्रेणीत एमबीबीएस परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. याबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. कुडाळ-सांगिर्डेवाडी येथील ऋतुराज राणे यांचे वडील राजन राणे तसेच आई रेखा राणे हे दोघेही पेशाने डॉक्टर असून आपला मुलगा डॉक्टर व्हावा यासाठी दोघांनी पहिल्यापासून परिश्रम घेतले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ