चिरेखण कामगार अस्वच्छतेबाबत कुडोपी ग्रामस्थ आक्रमक

कामगारांसाठी मालकांनी शौचालय व्यवस्था न केल्यास 12जानेवारी पासून उपोषणाला बसण्याचा इशारा
तहसीलदारांना निवेदन सादर
बुधवळे कुडोपी ग्रामपंचायत हद्दीमध्ये चिरेखण व्यवसाय सुरू असून तेथील मजुरांची शौचालय व्यवस्था नसल्याने उघड्यावर शौचालय केले जात आहे. संबंधित खाण मालकांना या बाबत वारंवार सुचित करुनही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास 12 जानेवारी पासून मालवण तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा बुधवळे कुडोपी ग्रामपंचायतीतर्फे लेखी निवेदनाद्वारे मालवण तहसीलदार यांना दिला आहे.
या निवेदनात त्यांनी बुधवळे कुडोपी हे गाव डोंगर उतारावर खोलगट भागात वसलेले असून डोंगरावरुन येणा-या नैसर्गिक झ-याचे पाणी पिण्यासाठी वापरत आहेत. परंतु खाण कामगार हे उघड्यावर शौचालयास बसत असल्याने वरुन येणारे पाणी हे नैसर्गिक झ-यांना मिळते. त्यामुळे झ-यांचे पाणी दुषीत होते. रोगराई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच बुधवळे कुडोपी गाव2008-09 मध्ये हागणदारी मुक्त गाव म्हणून घोषित झालेला आहे. असेे असताना खाण मालकांना कामगारांच्या शौचालयाची व्यवस्था करण्यास वेळोवेळी सांगूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने बारा जानेवारी पासून मालवण तहसील कार्यालया समोर उपोषणाला बसण्याचा इशारा मालवण तहसीलदार यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.





