जिल्हा भंडारी भवनच्या भूखंड प्रस्तावाला वेग

पालकमंत्र्यांनी दिला शब्द पाळला – अतुल बंगे
सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाजाने कुडाळ येथील भंडारी भवनासाठी मागणी केलेल्या भुखंडाची तातडीने कारवाई करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी देखील तातडीने याबाबतचा प्रस्ताव मागावुन घेतला आहे. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांनी भंडारी समाजाला दिलेला शब्द पाळला असल्याची प्रतिक्रिया कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळ अध्यक्ष अतुल बंगे यांनी दिली.
कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाज भवन व्हावे व त्यासाठी शासकीय भुखंड मिळावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाज महासंघाने जिल्ह्याचे पालकमंत्री ना नितेश राणे यांच्याकडे केली होती. या अनुषंगाने पालकमंत्री ना राणे यांनी आपण शब्द देत भंडारी भवन होणार आणि भुखंडही मिळणार असा शब्द दिला होता. या शब्दाला जागुन पालकमंत्री ना नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना आदेश देउन तातडीने प्रस्ताव मागावुन घेऊन कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांनी प्रस्ताव परीपुर्ण करुन उपविभागिय अधिकारी कुडाळ ऐश्वर्या काळोसे यांच्या कडे पाठवुन तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवुन कार्यवाही करण्यात आली. भंडारी समाजाला दिलेला शब्द पालकमंत्री ना नितेश राणे यांनी पाळला असल्याची प्रतिक्रिया कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळ अध्यक्ष तथा जिल्हा भंडारी समाजाचे माजी जिल्हा अध्यक्ष अतुल बंगे व जिल्हा भंडारी समाजाचे राजु गवंडे यांनी दिली.





